श्री नृसिंह संस्थान

P.T.R-A- 4803/PBN.

पोखर्णी, ता.जि. परभणी - 431521, महाराष्ट्र.

English

प्रस्तावना

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोखर्णी नृसिंह हे एक जागृत, जाज्वल्य असे प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे. श्री नृसिंह संस्थान तीर्थक्षेत्र हे अल्प अवधित प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र शासन मार्फत " तीर्थक्षेत्र ब " दर्जा तसेच धार्मिक पर्यटक " ब " दर्जा मिळालेला आहे. विकासात व प्रगतीमध्ये नेहमी अग्रेसर असलेले पर्यटकांचे आकर्षण ठरत असलेले पर्यटन स्थळ म्हणून उदयाला आले आहे. मंदिर प्रशासनातर्फे अनेक विकासयेजना व धार्मिक, सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रम राबविले जातात.

भक्तांच्या व पर्यटकांच्या पसंतीला उतरलेले परभणी जिल्ह्यातील एकमेव देवस्थान म्हणून उल्लेख करावा लागेल. भक्त व पर्यटक धकाधकीच्या जीवनातील सर्व कामे विसरून श्रीच्या चरणी दर्शन घेऊन आध्यात्मिक आनंद घेतात.

सर्व भक्तांना व पर्यटकांना मंदिरास भेट देण्यापूर्वी नियोजन करण्यासाठी इतर धार्मिक कार्यासाठी तसेच मंदिराच्या माहितीसाठी हे संकेतस्थळ आपणास उपयोगी पडेल यात शंका नाही. आपण येथे प्रत्यक्ष भेट देऊन नैसर्गिक आध्यात्मिक अनुभूतीचा आनंद घ्यावा.

मंदिराचा परिचय

मंदिरा समोर आल्यावर लगेच प्रशस्त असे मुख्य पूर्व प्रवेशव्दार मन मोहून घेते. प्रवेशव्दारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप भक्तांच्या नजरेत भरतो.

सभामंडपात प्रवेश केल्यानंतर पूर्वमुखी असलेल्या आनखीण एका प्रवेशव्दारातून आतमध्ये प्रवेश करावा लागतो. मुख्य मंदिर हेमाडपंथी असुन श्रीच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात जाण्यासाठी 2x3 फुट इतके छोटेसे प्रवेशव्दार आहे. या व्दारामधून एका वेळी एकाच व्यक्तीला खाली बसुन प्रवेश करावा लागतो. आतील गाभारा हेमाडपंथी शिलेवर बांधकाम केलेला आहे. या गाभाऱ्यात एका वेळेस केवळ 10 - 12 व्यक्तीच दर्शन घेऊ शकतात.

श्री नृसिंह देवतेची मूर्ती

श्री क्षेत्र पोखर्णी नृसिंह मंदिर गाभाऱ्यात श्रीची मूर्ती वालुकाष्म पाषाणाची असुन सुमारे 4 फुट इंचीची रोद्ररूप धारण केलेली आहे.

मुर्ती चतुर्भूज असुन एका हातात चक्र तर दुसऱ्या हातात शंख असुन उर्वरीत दोन्ही हातांनी हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध करतानाचे आहे. हि मुर्ती स्वर्णालंकृत व रत्नजडीत असून वस्त्र परिधान केलेली आहे.

श्रीचे शयन कक्ष

श्रीच्या गाभाऱ्यासमोर श्रीचे शयनकक्ष आहे. शयनकक्षात पुरातन लाकडी दिवाण असुन त्यावर रेशमी वस्त्राची बिछायत आहे. त्यावर श्री लक्ष्मी नृसिंहाची प्रतिमा आहे तसेच मोरपीसांनी सुशोभित केलेले आहे.

महादेव मंदिर

गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर अगदी समोर श्री महादेवतेचे मंदिर आहे. मनाला प्रसन्न करणारी महादेवाची शिवपींड आहे. तसेच तीन फुट उंचीची संगमरवर श्री गणेशाची मुर्ती आहे.

प्रचंड घंटा

मंदिराच्या सभामंडपात असलेला घंटा वाजवण्याचा मोह भक्तांना आवरने कठीणच जाते. हा घंटा मांगल्याचे प्रतिक असुन घंटयाच्या आवाज दूरवर पसरतो. पहाटे मंदिर उघडल्यावर अभिषेकापूर्वी व रात्रीच्या आरतीपूर्वी घंटानाद केला जातो.

गणपती मंदिर

मंदिराच्या पश्चिम प्रवेशव्दारा जवळ श्री गणेशाचे एक छोटे मंदिर आहे. त्यात गणेश वालुकाष्म मुर्ती आहे तसेच पाषाणाच्या गजलक्ष्मी, बालाजी व इतर देवतांच्या मुर्ती आहेत.

पुष्करणी तीर्थ ( बारव )

मंदिराच्या पश्चिम व्दारासमोर पवित्र असे तीर्थकुंड आहे. या तीर्थाच्या पाण्याने श्री चा अभिषेक केला जातो. या तीर्थामध्ये काही पायऱ्या उतरल्यावर मध्ये मोठया देवळीच्या रुपात दोन्ही बाजूला दोन मंदिरे आहेत.

श्री नृसिंह जयंती

वैशाख शु ९ ते वैशाख १५ पोर्णिमा या कालावधीत श्री नृसिंह नवरात्र व जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.

या उत्सवात भागवत / रामायण कथा / प्रवचन / किर्तनाचे आयेजन केले जाते. दररोज हजारो भाविक कथा किर्तनाचे श्रवण करतात तसेच जन्मोत्सवाच्या दिवशी लाखो भाविक उपस्थित असतात. जन्मोत्सवाच्या दिवसी श्रींची पालखी मंदिर प्रदक्षिणा असते. दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला महाप्रसादाचा कार्यक्रम व रात्री 8 ते पहाटे 4 पर्यंत गावातुन पालखी मिरवणुक निघते दरम्यान किर्तन, भारुड, गवळणी, अभंगाचा कार्यक्रम होतो. दुसऱ्या दिवशी वैशाख प्रतिपदेला काला व काल्याचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होते.

श्रावण मास

प्रतिवर्षी श्रावण मासात पावसाळी वातावरणात शनिवार भाविकांच्या गर्दीने फुलून जातो. शनिवार हा श्रीचा वार असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेता रात्री 1 वाजता अभिषेक व शाश्वतपूजा होते व नंतर मंदिर दर्शना साठी खुले होते.

या अवधीत रात्री अनवाणी पायाने पंचक्रोशितील भक्तगण दर्शना साठी येतात. या उत्सवात शनिवारी 10 - 15 हजार भाविक दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतात.

श्रावण मासात विदर्भ / मराठवाडा हुन पायी दिंड्या येथे येतात व तसेच जुन / जुलै महिन्यात दिंड्या येतात.

दसरा महोत्सव

दसरा महोत्सवातही श्रीची पालखी गावातुन काढली जाते. श्रीला सिमोलंघसाठी गावाबाहेरील देवीच्या मंदिरात नेले जाते. या पालखीत गावातील व गावाबाहेरील भक्त नवीन वस्त्र परिधान करून सहभागी होतात. देवीच्या मंदिरात श्रींची पालखी असताना गावकरी जवळील शेतात जाऊन सोनेरूपी आपटयाची पाने घेऊन येतात व श्रीच्या पालखीला व देवीला अर्पण करतात नंतर तेथून प्रस्थान होऊन पालखी मंदिरात परतते. या उत्सवात सहभागी झाल्याने मनाला आध्यात्मिक शांतता व उत्साह मिळतो.

पौष मास ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

पौष मासात श्रीच्या भव्य सभामंडपात संत विभूतीच्या मुखातून ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते. यामध्ये पारायण कीर्तन, भजन इत्यादी कार्यक्रम होतात. या सोहळ्यात आसपासच्या गावातील भक्तगण सहभागी होतात.

दैनंदिन कार्यक्रम

नित्य प्रात: समयी 4 ते 6 वेळेत काकडा आरती व श्री नृसिंह प्रभूंना रुद्राभिषेक, पवमान अभिषेक केल्या जातो.

सकाळी 6 ते 7 या वेळेत अलंकार पुजा होते. सकाळी 7 वाजता मंदिर दर्शनासाठी खुले होते.

दुपारी 1 वाजता श्रींना महानैवद्य दाखविल्या जातो. सायंकाळी 6 वाजता व रात्री 8 वाजता शेजारती होऊन मंदिर बंद होते.

रात्री 9 ते 12 प्रत्येक शनिवारी भजन व एकादशीला हरिकीर्तन होते. ( श्रावण महिन्यात या वेळेत काहीसा बदल केला जातो. )

व्यवस्था / उपलब्ध सुविधा

निवासी व्यवस्था / पर्यटक निवास

भाविकांच्या निवासासाठी येथे पर्यटक निवास उपलब्ध आहे. संस्थानातर्फे ही व्यवस्था कमी दर शुल्क असून भक्तांच्या स्वेच्छेने दिलेली देणगी स्विकारली जाते. भक्तांना ठराविक अशी किंमत मोजावी लागत नाही.

मंगल कार्यालय

भक्तांच्या सुविधेसाठी व धार्मिक कार्यक्रमासाठी तसेच लग्न, मुंज, प्रसाद आदी कार्यक्रमांसाठी होणाऱ्या जागेची टंचाई दुर करण्यासाठी संस्थानाने 50 x 100 रुंदीचा हॉंल असे मंगल कार्यालय आहे. त्याच्या बाजूला स्वयंपाक गृह आहे.

भव्य उद्द्यान / गार्डन

पर्यटक निवास व मंगल कार्यालयाच्या समोरील मैदानात भव्य उद्यान विकसित करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा पाम, आशोकाची झाडे असून लॉंन टाकून हा बगीच्या विकसित केला आहे. येथे मंदिरात येऊन भक्त व पर्यटक लॉंनमध्ये बसून वन भेजानाचा आनंद घेतात तसेच काही जन फोटोग्राफीची हौस पुर्ण करून घेतात.

वाहनतळ

संस्थान तर्फे होणारे विविध कार्यक्रम शनिवार व इतर दिवशी येणारे वाहन सोडण्यासाठी संस्थानने वाहनतळाची व्यवस्था केली आहे. हे वाहनतळ सुद्धा नि:शुल्क आहे.

पाणी पुरवठा

मंदिराची स्वत: ची पाण्याची व्यवस्था आहे. पाण्यासाठी एक टाकी उंचीवर बाधलेली आहे. बगीच्या मधिल विहिरीचे पाणी या टाकीत सोडले जाते व नंतर त्यातून सर्व ठिकाणी सोडले जाते. आपतकालीन परिस्थिती मध्ये गावात देखील पाणी पुरवठा केला जातो.

स्नान गृह

भक्तांच्या व पर्यटकांच्या सोयीसाठी संस्थानने स्नान गृहची व्यवस्था केली आहे.

विद्युत व्यवस्था

मंदिरामध्ये अविरत विज चालु राहण्यासाठी इनव्हरटर, जनरेटर ची व्यवस्था आहे. मंदिरने भक्तांच्या सोयीसाठी लाईट बसवले आहेत. मंदिरात योग्य रीतीने विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे.

सुरक्षा व्यवस्था

मंदिर संस्थानने मंदिराच्या सुरक्षेसाठी जागोजागी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवले आहेत तसेच सुरक्षा कर्मचारी सुद्धा कार्यरत असतात.

महाप्रसाद

श्री नृसिंह संस्थान तर्फे भक्तांना दर शनिवारी दुपारी 1 ते 4 या वेळेमध्ये महाप्रसाद दिला जातो. हा महाप्रसाद नि:शुल्क आहे.

वेगळेपण

पोखर्णी येथे भाजलेल्या मातीच्या विटीचे ( पक्क्या विटीचे ) एकही घर दिसणार नाही तसेच दुमजली इमारती पाहण्यास मिळत नाही.

येथे बऱ्याच घरात लाकडी पलंग ( दिवाण ) दिसणार नाही असेल तरी त्याचा वापर ते झोपण्यासाठी शक्यतो करत नाहीत.

येथे छत्री व काळा कपडा शक्यतो वापरत नाहीत.

पोखर्णीतील इतर प्रेक्षणीय स्थळे

भुजंगबुवा मठ

श्री नृसिंह मंदिराच्या पश्चिमेस गावाच्या बाहेरील बाजुस प्राचीन काळातील भुजंगबुवाचा मठ हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे.

भवानी अंबाबाईचे मंदिर

दसऱ्याला पालखी विश्रांतीचे हे स्थान अतिषय रमनिय, पाथरी - परभणी रोडवर आहे.

महादेवाचे मंदिर

गावाच्या पश्चिमेस महादेवाचे मंदिर असुन त्या मंदिराचा परिसर सुशोभित आहे.

खंडोबाचे मंदिर

महादेव मंदिराच्या बाजुस श्री खंडोबाचे मंदिर आहे.

हनुमान मंदिर

पोखर्णी गावात पुर्वेस एक हनुमान मंदिर व पश्चिमेस एक हनुमान मंदिर असे पुर्वामुखी व पश्चिममुखी असे दोन हनुमान मंदिर आहेत.

विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर

मंदिराच्या अगदी जवळ तीर्थकुंडाच्या मागेच श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. येथे नेहमी धार्मिक कार्यक्रम चालतात.

मंदिर शेजारील मठ

मंदिराच्या दक्षिण भागास मंदिराजवळ एक मठ आहे. या मठामध्ये श्री दत्त मंदिर तसेच शनिमंदिर आहे.

संत ज्ञानेश्वर मंदिर

गावामध्ये संत ज्ञानेश्वरांचे मंदिर आहे. येथे सुद्धा भजन, किर्तन होत असते.

संत सावता महाराज मंदिर

श्री नृसिंह मंदिर रोडवरच श्री संत सावता महाराजांचे मंदिर आहे.

फोटो संच

संपर्क

श्री नृसिंह संस्थान - विश्वस्थ मंडळ पोखर्णी ( नृ. ) ता. जि. परभणी - 431521, महाराष्ट्र.

दुरध्वनी क्रमांक :- 02452-267012, मोबाईल क्रमांक :- +91-9673112384.

ईमेल :- narsiha.sansthan.pokharni@gmail.com

बँक तपशिल

भक्तांनी देणगी देण्यासाठी संस्थानच्या बँक खात्याचा तपशील

 

1. स्टेट बँक ऑफ इंडिया

खाते नाव :- श्री नृसिंह संस्थान पोखर्णी

शाखा नाव :- परभणी.

पत्ता :- शिवाजी रोड, ता. जि. परभणी - 431401.

खाते नंबर :- 33166367115. / IFSC Code :- SBIN0003667. / MICR :- 431002957.

 

2. स्टेट बँक ऑफ हैद्राबाद

खाते नाव :- श्री नृसिंह संस्थान पोखर्णी ( नृ. )

शाखा नाव :- दैठणा.

खाते नंबर :- 62180577400. / IFSC Code :- SBHY0020416.

 

या महिन्यातील शाश्वत पुजा, आणि नवीन माहितीसाठी.

कसे याल?

विमान प्रवास

औरंगाबाद ( चिकलठाणा विमानतळ ) येथुन २५० कि.मी. अंतरावर पोखर्णी ( नृ. ) हे तिर्थ क्षेत्र आहे. औरंगाबादहुन पोखर्णी ( नृ. ) पर्यंत रेल्वे तसेच बस व खाजगी वाहन उपलब्ध आहे.

रेल्वे मार्ग

पोखर्णी ( नृ. ) येथे रेल्वे स्टेशन आहे. भारतातुन कोणत्याही ठिकाणाहुन पोखर्णी ( नृ. ) ला रेल्वेने येणे सोईस्कर ठरते. परभणी ते गंगाखेड लोहमार्गावर परभणी व गंगाखेड पासुन समान अंतरावर पोखर्णी ( नृ. ) हे रेल्वे स्टेशन आहे. स्टेशन वरून २ कि.मी. अंतरावर श्री नृसिंह मंदिर आहे.

रस्ता मार्ग

परभणी - गंगाखेड महामार्गावर परभणी पासुन १८ कि.मी. व गंगाखेड पासुन २१ कि.मी. अंतरावर पोखर्णी फाटा आहे. त्यापासुन १.५ कि.मी. अंतरावर श्री नृसिंह मंदिर आहे.

 
 
 
 
 

प्रतिपृष्टी